
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवली. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या दिग्वेश राठीचाही समावेश आहे.
मात्र दिग्वेशच्या शानदार कामगिरीला मात्र वादाची किनार लाभलेली आहे. पण असे असले तरी दिग्वेशने त्याच्या गोलंदाजी शैलीने मात्र सर्वांना प्रभावित केले.