
Maharashtra vs Baroda: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा दुसरा टप्प्याला गुरुवारी (२३ जानेवारी) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र संघाचा सामना कृणाल पांड्याच्या नेतृत्वातील बडोदा संघाविरुद्ध नाशिकमध्ये सुरू आहे. या सामन्यात महाराष्ट्राने कर्णधार ऋतुराज गायकवाडने झळकावलेल्या वादळी अर्धशतकामुळे मोठी आघाडी मिळवली आहे.