
भारतीय क्रिकेट संघ आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वूड याला पुढील ४ महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
वूडच्या डाव्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर त्याला किमान ४ महिन्यांची विश्रांती गरजेची असल्याचे इंग्लंड क्रिकेटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.