Hardik Pandya wants to leave MI: "आता माझ्याने होणार नाही..."! IPL 2026 मध्यंतरालाच हार्दिक पांड्याने घेतला संघ सोडण्याचा निर्णय; धक्कादायक कारण आले समोर

Hardik Pandya informs MI management about leaving team: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आयपीएल २०२६ नंतर संघ सोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी चर्चा रंगली आहे. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आल्यानंतर हार्दिक मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली होता आणि पूर्णपणे थकून गेला होता, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
Hardik Pandya wants to leave MI

Hardik Pandya wants to leave MI

esakal

Updated on

Hardik Pandya mentally stressed after MI playoff exit: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात लवकरच नेतृत्वबदल झालेला पाहायला मिळणार आहे. सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या याने, आता माझ्याने होणार नाही..., असे MI व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगून टाकले आहे. हार्दिक फ्रँचायझी सोडणार असून, त्याने हंगामाच्या मध्यातच संघ व्यवस्थापनाला ही गोष्ट कळवली आहे, अशी माहिती स्पर्धेतील एका वरिष्ठ सूत्राने शुक्रवारी पीटीआयला दिली. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या जागी ३२ वर्षीय हार्दिकने संघाचे नेतृत्व स्वीकारले होते. पण, मागील तीन पर्वात संघाची कामगिरी निराशाजनक झाली आणि IPL 2026 मोहीम संपण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाला फ्रँचायझी सोडण्याबद्दल कळवले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com