Hardik Pandya reveals Rohit Sharma may miss a few more matches for Mumbai Indians
esakal
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Marathi Update: मुंबई इंडियन्सचे भविष्य आता पूर्णपणे त्यांच्याच हातात आहे. ७ सामन्यांत फक्त २ विजय मिळवून ते नवव्या क्रमांकावर आहेत आणि प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना सातही सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये त्याच्यांसमोर तालिकेत १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे. रोहित शर्मा खेळणार की नाही, हा प्रश्न कालपर्यंत अनुत्तरीतच होता.