

Ryan Rickelton blazing
esakal
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Marathi Update: रायन रिकल्टन व विल जॅक्स या नव्या ओपनिंग जोडीने मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या स्पर्धेत कायम राहण्याचे स्वप्न दाखवले. या दोघांनी सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना ७.१ षटकांत ९३ धावा चढवल्या. पुनरागमनाची मिळालेली संधी, रिकल्टन सोडू इच्छित नव्हता आणि त्याने विक्रमी फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवचे अपयश ही MI साठी डोकेदुखीच बनली आहे. रिकल्टनने ४४ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि हे मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले.