India vs Pakistan
Sakal
Cricket
T20 World Cup 2026: भारतीय संघ फायनलपर्यंत पोहचणार की नाही? विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही केलं भाष्य
Michael Clarke Predicts T20 World Cup 2026 Finalist: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी कोणते दोन संघ प्रबळ दावेदार आहेत, याबाबत दिग्गज क्रिकेटपटूने भविष्यवाणी केली आहे.
Michael Clarke Predicts T20 World Cup 2026 Finalist: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारत आणि श्रीलंका या दोन देशात खेळला जाणार आहे. ७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल, तर ८ मार्च रोजी अंतिम सामना होणार आहे. भारतातील ५ आणि श्रीलंकेतील ३ अशा एकूण ८ स्टेडियममध्ये सामने खेळले जातील.
या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार असल्याने रोमांचक सामने पहायला मिळतील अशी अशा चाहत्यांना आहे. दरम्यान, या २० संघापैकी कोणते संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वनडे वर्ल्ड कप विजेता कर्णधार मायकल क्लार्कने (Michael Clarke) अंतिम सामना कोणते दोन संघ खेळू शकतात, याचा अंदाज व्यक्त केला आहे.

