

Bangladesh Cricket Team
Sakal
Who will Replace Bangladesh In T20 WC 2026? : बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून आणि बांगलादेश सरकारकडून त्यांच्या क्रिकेट संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतात पाठवण्यासाठी नकार देण्यात आला आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
मुस्तफिजूर रेहमानला आयपीएल २०२६ मधून बीसीसीआयने (BCCI) काढल्यानंतर दोन्ही देशातील क्रिकेट संबंध बिघडले. त्यानंतर बांगलादेशने सुरक्षेच्या कारणाने टी२० वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2026) संघाला भारतात पाठवणार नसल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी आयसीसीला पत्रं लिहून जागा बदलण्याची विनंती केली होती.