

Jasprit Bumrah | Sri Lanka vs India 2nd Test
Sakal
ICC Test Rankings Marathi News: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या महत्त्वाच्या कसोटी मालिका सुरू आहेत. अशातच बुधवारी (२६ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मोठा धक्का बसला आहे. त्याला आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे.
बुमराहने २०२४ मध्ये पहिल्यांदा कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर जवळपास दोन वर्षे तो अव्वल क्रमांकावर कायम होता. मात्र तो दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकल्याने आता त्याच्या वर्चस्वाला धक्का लागला आहे.