Mohammad Shami चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार? तो Video शेअर करत टीम इंडियाला दिली गुडन्यूज

Mohammad Shami Updates: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाकडून पुनरागमन करणार कधी हा प्रश्न जवळपास गेल्या वर्षभरापासून विचारला जात आहे. अशातच आता शमीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.
Mohammad Shami
Mohammad ShamiSakal
Updated on

Mohammad Shami Video: भारताचा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाकडून पुनरागमन करणार कधी हा प्रश्न जवळपास गेल्या वर्षभरापासून विचारला जात आहे. शमीने भारतासाठी अखेरचे क्रिकेट नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळले आहे.

म्हणजे संपूर्ण २०२४ वर्ष शमी भारतीय संघातून बाहेर होता. पण आता १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेत तरी शमी दिसणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान, शमीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओने भारतीय संघासह चाहत्यांनाही दिलासा दिला आहे.

Mohammad Shami
बुमराह, सिराज OUT; यशस्वी जैस्वालचे वन डे पदार्पण, IND vs ENG मालिकेसाठी BCCI चा प्लॅन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com