BCCI Central Contract List : बीसीसीआयच्या वार्षिक करारात कोणाचं प्रमोशन तर कोणाचं डिमोशन?

BCCI Central Contract List : बीसीसीआयने यंदाच्या वार्षिक करारात चार खेळाडूंना प्रमोशन दिलं तर दोन खेळाडूंचे डिमोशन केलं आहे.
BCCI Central Contract List Mohammed Siraj
BCCI Central Contract List Mohammed Sirajesakal

BCCI Central Contract List Mohammed Siraj : बीसीसीआयने नुकतेच 2023 - 24 वर्षासाठी आपल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला वगळून बीसीसीआयने एकप्रकारे खेळाडूंना इशाराच दिला आहे. बीसीसीआयने यंदाच्या करारात अनेक युवा खेळाडूंनी संधी दिली आहे. तसेच काही खेळाडूंना बढती दिली असून काही खेळाडूंचे डिमोशन झाले आहे.

बीसीसीआयच्या नव्या केंद्रीय करारात मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल अन् कुलदीप यादवचं प्रमोशन झालं आहे. तर ऋषभ पंत, अक्षर पटेल यांच डिमोशन झालं आहे.

BCCI Central Contract List Mohammed Siraj
BCCI Annual Contract : अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं! बीसीसीआयनं अय्यर, किशनचा विषयच संपवला?

केंद्रीय करारात ग्रेड मध्ये बदल झालेले खेळाडू

  • केएल राहुल - ग्रेड B मधून ग्रेड A मध्ये प्रमोशन

  • मोहम्मद सिराज - ग्रेड B मधून ग्रेड A मध्ये प्रमोशन

  • शुबमन गिल ग्रेड - B मधून ग्रेड A मध्ये प्रमोशन

  • कुलदीप यादव - ग्रेड C मधून ग्रेड B मध्ये प्रमोशन

  • ऋषभ पंत - ग्रेड A मधून ग्रेड B मध्ये डिमोशन

  • अक्षर पटेल - ग्रेड A मधून ग्रेड B मध्ये डिमोशन

या यादीत अनेक नवीन नावे आहेत. त्यात रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांचा ग्रेड C मध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारे ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांचा मात्र समावेश नाही.

BCCI Central Contract List Mohammed Siraj
Hanuma Vihari Controversy : तो काही असा-तसा खेळाडू वाटला का.... विहारी प्रकरणावरून माजी क्रिकेटपटू भडकला

डिमोश झालेला ऋषभ पंत हा गेल्या वर्षभरापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याने वर्षभरापासून एकही सामना खेळला नसल्याने त्याला करारातून बाहेर करता आलं असतं. मात्र बीसीसीआयने अपघातामुळे दुखापत झाल्यामुळे पंतविषयी सहानभूती ठेवली आहे. तो यंदाच्या आयपीएल हंगामातून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक करारानुसार ग्रेड A+ मधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रूपये मिळतात. तर ग्रेड A मधील खेळाडूंना 5 कोटी रूपये, ग्रेड B मधील खेळाडूंना 3 तर ग्रेड C मधील खेळाडूंना 1 कोटी रूपये मिळतात.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com