Pakistani journalists confront Mohsin Naqvi over Asia Cup trophy controversy
esakal
Mohsin Naqvi response on Asia Cup trophy controversy: आशिया चषक २०२५ स्पर्धेत झालेला वाद मिटण्याचं नाव घेत नाहीए. पाकिस्तान संघाविरुद्ध भारतीय संघाने घेतलेली कठोर भूमिका, चर्चेत राहिली आणि त्यानंतर आशिया चषक फायनलमध्ये रंगलेले नाट्य, साऱ्यांनी पाहिले. पाकिस्तानला फायनलमध्ये लोळवल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ट्रॉफी घेण्यास व्यासपीठावर आलेच नाही. या अपमानाने पेटलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले. त्यानंतर ACC च्या बैठकीत बीसीसीआयने PCB च्या अध्यक्षांना खडेबोल सुनावले. पण, अजूनही टीम इंडियाला ट्रॉफी मिळालेली नाही.