मोहसिन नक्वीची नवी मागणी! India vs Pakistan मॅच हवी असेल तर तिरंगी मालिका खेळवा; ज्यामध्ये भारत, पाकिस्तान अन्...

India vs Pakistan T20 World Cup boycott latest update: पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी भारताविरुद्धच्या वर्ल्ड कप सामन्याबाबत नवीच अट समोर ठेवली आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या भारत–पाकिस्तान सामन्याचा बहिष्कार मागे घ्यायचा असेल, तर तिरंगी मालिका आयोजित करण्यात यावी, असा प्रस्ताव नक्वी यांनी मांडल्याचे समोर आले आहे.
PCB chief Mohsin Naqvi has proposed a tri-nation series involving India, Pakistan and Bangladesh

PCB chief Mohsin Naqvi has proposed a tri-nation series involving India, Pakistan and Bangladesh

esakal

Updated on

Mohsin Naqvi proposes tri nation series : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) एकामागून एक नवीन मागण्या करताना दिसत आहेत. भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका, महसुलात जादा वाटा अशा मागण्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) मान्य होऊ शकत नसल्याचे दिसताच मोहसिन नक्वीने नवीन मागणी केली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan सामना व्हावा असे वाटत असेल तर मागणी मान्य करा, अशी अट पीसीबीने ठेवली आहे. आता हा मुद्दा आता पाकिस्तान पंतप्रधान शाहबाझ शरिफ यांच्याकडे गेला आहे आणि ते यू टर्न मारण्याची शक्यता अधिक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com