India vs Pakistan Asia Cup 2025 Super 4 date and time
esakal
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचा पहिला सामना रंगला आणि भारताने पाकिस्तानला धूळ चारली.
सूर्यकुमार यादवने नाणेफेकीदरम्यान पाक कर्णधाराशी हस्तांदोलन नाकारले.
सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
How India and Pakistan can meet again in Asia Cup 2025 : भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला अपमानीत करण्याची आणखी संधी मिळणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काल प्रथमच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाला.. या सामन्यात भारताने नुसता विजय मिळवला नाही, तर पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलामन अली आगा याच्यासोबत नाणेफेक करताना हस्तांदोलन केले नाही. त्याचाच कित्ता संपूर्ण संघाने गिरवला अन् सामन्यानंतर हस्तांदोलनासाठी उभ्या असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंकडे पाठ दाखवली. पाकिस्तानची जगासमोर असे वाभाडे कुणीच काढले नव्हते.