MS Dhoni's advice to the Gen Z : युवा पिढीला तू काय सल्ला देशील? महेंद्रसिंग धोनीचा Video पाहायला हवा; म्हणाला, विनंती करतो...

MS Dhoni's advice to the Gen Z : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी केवळ मैदानावरील कामगिरीसाठीच नव्हे, तर त्याच्या साध्या विचारांसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. आता युवा पिढीसाठी धोनीने दिलेला एक खास संदेश चर्चेत आला आहे.
MS Dhoni's advice to Gen Z and young generation

MS Dhoni's advice to Gen Z and young generation

Updated on: 

MS Dhoni's advice to Gen Z and young generation: जगभरात सध्या Gen Z , Gen Alpha यांची चर्चा आहे... सत्ताधाऱ्यांविरोधात त्यांनी बंड पुकारलेले पाहायला मिळतेय, जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळणही आलेले दिसतेय. पण, भारतातील Gen Z शांततेच्या मार्गाने आपले विचार, आपले मुद्दे मांडताना दिसतेय. कॉकरोच जनता पार्टी असो किंवा नेहा बोरा, असे अनेक युवक-युवती त्यांना जे पटलेलं नाही, त्याविरोधात उभे राहिले आहेत आणि त्यांना युवकांसह अनेकांचा पाठिंबाही मिळतोय. अशा Gen Z आणि Gen Alpha ला जेव्हा सल्ला काय द्यावा, हा प्रश्न येतो. तेव्हा बरेच मान्यवर वरवरची मतं मांडून मोकळी होतात. पण, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं खरंच विचार करायला लावणारा सल्ला या पिढीला दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com