
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने सोमवारी (७ जुलै) त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा केला. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याला आजी-माजी खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहे. धोनी जसा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तसाच तो त्याच्या साध्या वर्तवणूकीसाठीही ओळखला जातो.