

MS Dhoni Names India as ‘Most Dangerous Team’
Sakal
MS Dhoni Names India as ‘Most Dangerous Team’: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. भारतीय संघ यंदा गतविजेता म्हणून खेळणार आहे, विशेष म्हणजे भारताला आता घरच्या प्रेक्षकांसमोर खेळून ट्रॉफी राखण्याचे आव्हान आहे.
आजपर्यंत कोणताही संघ सलग दोन टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेला नाही आणि घरच्या मैदानातही विजेतेपद मिळवलेलं नाही, त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वातील भारतीय संघाला (Team India) हा इतिहास बदलण्याची संधी आहे.