

Ricky Ponting’s Prediction on T20 World Cup 2026
Sakal
Ricky Ponting’s Prediction on T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा आता चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी सहभागी संघ भारत आणि श्रीलंकेत दाखल होत असून सराव सामन्यांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या या वर्ल्ड कपबद्दल बरीच चर्चा असून विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यानेही या स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणता खेळाडू करू शकतो आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरू शकतो, याबाबत मत व्यक्त केले आहे.
रिकी पाँटिंगने भारताचा २५ वर्षीय सलामीवीर अभिषेक शर्माचे (Abhishek Sharma) भरभरून कौतुक करताना तो आगामी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत (T20 World Cup) सर्वाधिक धावा करू शकतो असं म्हटलं आहे. तसेच तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरू शकतो.