धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

How India Celebrated 2007 T20 World Cup Win 19 Years Ago: भारतीय संघाने २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात पहिला टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्या विजयाला आता १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी भारताने कसे सेलिब्रेशन केलं होतं पाहा व्हिडिओ
T20 World Cup 2007 India Victory Celebration 2007

T20 World Cup 2007 India Victory Celebration 2007

Sakal

Updated on

India's T20 World Cup 2007 Victory: २४ सप्टेंबर २००७ ही तारीख भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलेली गेलेली आहे. कारण याचदिवशी भारताचा क्रिकेट संघ तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन म्हणून ओळखला गेला होता. याचदिवशी भारत पहिला वहिला टी२० वर्ल्ड कप विजेता संघ ठरला होता.

क्रिकेटमध्ये सातत्याने काळानुसार बदल होत गेले आहेत. कसोटीपाठोपाठ वनडे क्रिकेट आलं, त्यानंतर क्रिकेट रंगीत कपड्यांमध्येही खेळलं जाऊ लागलं आणि मग उगम झाला ट्वेंटी-२० क्रिकेटचा. सुरुवातीला या प्रकारावर बरीच चर्चा झाली. आज ज्या भारतात टी२० क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा होते, त्याच भारताकडून सुरुवातीला या प्रकाराला नकार मिळत होता. पण २००७ च्या टी२० वर्ल्ड कपने सर्वच चित्र बदललं.

T20 World Cup 2007 India Victory Celebration 2007
T20 World Cup 2007 Video: पहिल्याच सामन्यात दिसली होती थालाची चाणक्यनीती, पाकिस्तानचा बॉल आऊटमध्ये झालेला पोपट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com