
भारताचा महान कर्णधार एमएस धोनीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत मोठे यश मिळवले. कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सोमवारी मोठा गौरव करण्यात आला.
आयसीसीने त्याचा समावेश आता हॉल ऑफ फेमध्ये केला आहे. त्याला मॅथ्यू हेडन, हाशिम आमला, ग्रॅमी स्मिथ, डॅनिएल विट्टोरी, सना मीर आणि सारा टेलर या दिग्गजांसह सोमवारी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले.