MS Dhoni Retirement: मै हर एक पल का शायर! धोनीने शेअर केला निवृत्तीनंतर खास Video; म्हणाला, 'चाहत्यांनी मला चुकीचे ठरवले...'

MS Dhoni Retirement Video: एमएस धोनीने मंगळवारी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. यासोबतच त्याची खेळाडू म्हणून कारकिर्द संपल आहे. त्याने निवृत्तीनंतर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.
MS Dhoni Retirement Video

MS Dhoni Retirement Video

Sakal

Updated on: 

MS Dhoni Retirement Video Post: एमएस धोनी मंगळवारी (१७ नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्त झाला आहे. तो २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. पण त्यानंतरही त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले होते. त्यामुळे त्याच्या आयपीएलमधील भवितव्याबाबतही बरीच चर्चा गेल्या काही वर्षात झाली.

त्यातच गेल्या काही हंगामात गुडघ्याच्या आणि पायाच्या दुखापतीने त्याला त्रस्त केल्याचे दिसले होते. २०२६ हंगामातही तो दुखापतीमुळेच खेळला नव्हता. त्यामुळे आयपीएल २०२७ मध्ये तो खेळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले गेले. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

MS Dhoni Retirement Video
Dhoni Retirement: एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत
Loading content, please wait...