

MS Dhoni WhatsApp Message To Smriti Mandhana after World Cup Win
Sakal
MS Dhoni WhatsApp Message To Smriti Mandhana After World Cup Triumph: भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईत दक्षिण आफ्रिकेला हरवून वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली होती. भारतीय महिला संघाची ही पहिली मोठी आयसीसी ट्रॉफी ठरली होती. त्यामुळे हा विजय खास होता.
भारतीय महिला संघाच्या या विजयाबद्दल संपूर्ण देशभरात जल्लोष झाला होता. दरम्यान, या खास यशानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने स्मृती मानधनाला खास मेसेज केला होता.