

MS Dhoni To Play IPL Till 60 His Honest Reply Sparks Buzz
esakal
IPL 2026 MS Dhoni news update : ४४ वर्षीय महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल, असे भाकित भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण व रॉबिन उथप्पा यांनी केले आहे. पण, भारताचा कॅप्टन कूल वयाच्या ६० वर्षांपर्यंत खेळावा अशी चाहत्यांची इच्छा आहे आणि MS Dhoni नेही चाहत्यांच्या या इच्छेला सकारात्मक उत्तर दिले आहे. इंडियन प्रीमियर लीगचा १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( RCB vs SRH) यांच्यात पहिला सामना होईल. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, चाहते महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठीही तितकेच उत्सुक आहेत आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटी येथे उतरणार आहे.