
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. याचदरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनला मात्र मोठा धक्का बसला आहे. मुंबई संघातील युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आता आगामी देशांतर्गत हंगामात गोवा संघाकडून खेळताना दिसणार आहे.
त्याला गोवा संघाकडून नेतृत्वाची ऑफर होती, जी त्याने स्वीकारली असून मुंबईकडे ना हरकर प्रमाणपत्रही मागितले असल्याचे समोर आले आहे.