
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला ८ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी विजयी षटकार मारणाऱ्या सूर्यकुमार यादवने मोठा विक्रम नावावर केला आहे.