
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास झालेली दिसत नाही. घरच्या मैदानावरील विजय सोडल्यास मुंबईला तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यात आज घरच्या मैदानावर त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करावा लागणार आहे. अशात मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला महिला प्रीमिअऱ लीगमध्ये दोन जेतेपद मिळवून देणारी प्रशिक्षक चार्लोट एडवर्ड्सने ( Charlotte Edwards ) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एडवर्ड्स आता इंग्लंडच्या महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.