

Carl Hopkinson Joins Mumbai Indians As Fielding Coach: आयपीएल मेगा लिलावानंतर सर्व संघांनी आगामी आयपीएलच्या सरावाला सुरूवात केली आहे. फ्रॅंचायझींच्या प्रशिक्षण शिबीरालाही सुरूवात झाली आहे. अशातच मुंबई इंडियन्सने वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षकाला ताफ्यात सामील करून घेतले आहे.
इंग्लंडचा फिल्डिंग कोच कार्ल हॉपकिन्सन मुंबई संघाच्या प्रशिक्षक टीममध्ये पाहायला सामील झाला आहे. आगामी आयपीएल हंगामात कार्ल हॉपकिन्सन मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच म्हणून काम पाहाणार आहे.