MI Captaincy : हार्दिक पांड्या तर पंजाबमध्ये गेला, मग मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण होणार? फ्रँचांयझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Mumbai Indians Official Captaincy Update: आयपीएल २०२७ आधी हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघांनी आदलाबदली केली आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२७ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण असणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Mumbai Indians Captain Update

Mumbai Indians

Sakal

Updated on: 

Who Will Be Mumbai Indians' Next Captain? : इंडियन प्रीमियर लीग २०२७ साठी पुढच्या महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. पण त्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात मोठा ट्रेड झाला आहे.

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची या दोन संघांनी आदलाबदली केली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेडपैकी हा एक ट्रेड मानला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.

Mumbai Indians Captain Update
Arshdeep Singh ची आधी मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री अन् मग लगेचच उरकला साखरपुडा; कोण आहे जोडीदार? पाहा Photo
Loading content, please wait...