Mumbai Indians Squad for IPL 2026
esakal
Mumbai Indians squad 2026 full list after IPL 2026 auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावात मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात कमी रक्कम घेऊन आला होता. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने त्यांचे प्रमुख खेळाडू कायम राखले होते आणि त्यांना लिलावात फक्त ५ खेळाडूंना घेऊन आपला २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण करायचा होता. पण, हे पाच खेळाडू घेताना त्यांची अन्य फ्रँचायझींकडून कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खिशात २.७५ कोटी असताना MI चे मालक आकाश अंबानी यांनी कॅमेरून ग्रीनसाठी २.४० कोटींची बोली लावली. तो एक गमतीचा भाग होता. कमी रकमेतही MI ने चांगली संघबांधणी केली.