
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात ब्रबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यांनी याआधी २०२३ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते. त्यावेळीही याच मैदानावर मुंबईने दिल्लीचा पराभूत केले होते.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दिल्ली सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यांना तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकात ९ बाद १४१ धावाच करता आल्या.