

Sarfaraz Khan
Sakal
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा अंत्यत चुरशीची होत आहे. गुरुवारी (८ जानेवारी) या स्पर्धेत मुंबई विरुद्ध पंजाब संघात आणखी एक अत्यंत रोमांचक सामना पाहायला मिळाला.
या सामन्यात अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) नेतृत्वातील पंजाब संघाने केवळ १ धावेने मुंबईला पराभूत केले. मुंबईसाठी सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी चांगली फलंदाजी केली, पण त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडले.