

KKR Confirms Release of Mustafizur Rahman
Sakal
Crore in IPL, Now PSL Deal: Mustafizur Rahman’s Shocking Turnaround: बांगलादेशातील वाढत्या तणावामुळे मुस्ताफिजूर रहमान याची इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधून कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR ) हकालपट्टी केली. त्यामुळे वातावरण प्रचंड तापले आहे आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ( BCB) भारतात होणारे त्यांचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती आयसीसीकडे केली आहे. अशात मुस्ताफिजूरच्या मदतीला पाकिस्तान धावून आला आहे. पाकिस्तान सुपर लीगने ( PSL ) मुस्ताफिजूरने खेळण्यासाठी करारबद्ध केले आहे. पण, आयपीएलमध्ये त्याला ९.२० कोटी मिळणार होते, त्यातुलनेत तो कवडी भावात PSL मध्ये खेळणार आहे.