

NCC Mumbai Selects 45 Young Cricketers In Talent Hunt
Sakal
NCC TALENT HUNT SELECTION: नॅशनल क्रिकेट क्लब (NCC), मुंबईतर्फे नुकत्याच पार पडलेल्या ‘टॅलेंट हंट’मधून निवड झालेल्या प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची घोषणा करण्यासाठी आज क्लबमध्ये गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून एकूण 45 खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये 16 फलंदाज, 14 गोलंदाज, 12 अष्टपैलू खेळाडू आणि 3 विशेष यष्टिरक्षकांचा समावेश आहे.