Sandip Lamichhane : बलात्कार प्रकरणात संदीप लामिछानेला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; टी 20 वर्ल्डकप संघात...

Sandeep Lamichhane
Sandeep Lamichhane Rape Caseesakal

Sandeep Lamichhane Rape Case : नेपाळाच्या पटान उच्च न्यायालयाने त्यांच्या देशाचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशनने संदीपची नेपाळच्या टी 20 वर्ल्डकप संघात निवड केली आहे. संदीप लामिछानेवर 18 वर्षाच्या एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

Sandeep Lamichhane
IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

नेपाळचा स्टार स्पिनर संदीप लामिछानेवर 2022 मध्ये तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर त्याला याच प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. सुरूवातीला ही केस काठमांडू येथील जिल्हा न्यायालयात सुरू होती. तेथे लामिछानेला दोषी ठरवून त्याला 8 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर नेपाळ क्रिकेट संघाने संदीपला निलंबित केलं होतं.

उच्च न्यायालयात लामिछानेला दिलासा

दरम्यान, पाटन उच्च न्यायालयाने संदीप लामिछानेला दिलासा दिला. उच्च न्यायालयाने संदीपची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. न्यायधीश सूर्य दर्शन देव भट्टा आणि अंजू उप्रेती ढकाल या खंडपीठाने काठमांडू न्यायालयाने संदीपला दिलेली आठ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा रद्द केली. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा हा निकाल पुराव्यांच्या अभावामुळे रद्द करत असल्याचे सांगितले.

Sandeep Lamichhane
DC Playoffs Scenario : दिल्लीचं नशिब हैदराबादच्या हाती! प्लेऑफ गाठण्यासाठी जुळावे लागणार 'हे' गणित...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com