

न्यूझीलंड क्रिकेट संघाला शनिवारी मोठा धक्का बसला आहे. सध्या संघ पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने लाहोरमध्ये पाकिस्तानला ७८ धावांनी पराभूत केले, पण या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू रचिन रवींद्र दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या दुखापतीवर आता न्यूझीलंडने अपडेट्स दिल्या आहेत.