
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा विक्रमी ठरताना दिसत आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने विश्वविक्रम केला आहे.
त्यांनी ११ दिवसांपूर्वी २२ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांनी केलेले विक्रम मागे टाकले आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर ३६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.