
न्यूझीलंड क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. न्यूझीलंडने बुधवारी (५ मार्च) झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५० धावांनी पराभवाचा धक्का दिला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली.
न्यूझीलंडचा आता अंतिम सामना भारतीय संघाविरुद्ध दुबईत होणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत न्यूझीलंडला भारताने या स्पर्धेत पराभूत केलं होतं. आता यानंतर हे दोन संघ पुन्हा आमने सामने येणार आहेत.
याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होण्याचीही ही एकूण दुसरी वेळ असेल. यापूर्वी २००० साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते.