NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

New Zealand Defeat South Africa to Reach T20 WC Final: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. स्पर्धेत अपराजित राहिलेला आफ्रिकेचा संघ मोक्याच्या सामन्यात पुन्हा एकदा दबावाखाली कोसळला आणि ‘चोकर्स’ हा ठप्पा कायम राहिला.
New Zealand defeated South Africa in the T20 World Cup semi-final to enter the final

New Zealand defeated South Africa in the T20 World Cup semi-final to enter the final

esakal

Updated on

Who will New Zealand face in T20 World Cup final India or England? न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले. स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ असलेला आफ्रिकेचा संघ मोक्याच्या सामन्यात पुन्हा एकदा 'चोकर्स' ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा आफ्रिकेवरील पहिलाच विजय ठरला, यापूर्वी पाच सामन्यांत आफ्रिकेने बाजी मारली होती. पण, आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीचा इतिहास पाहिला, तर न्यूझीलंडने बाद फेरीत आफ्रिकेला नेहमी पराभूत केले आहे. तिच परंपरा आजही कायम राखताना न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्यासमोर भारत किंवा इंग्लंड यांच्यातल्या विजेत्याचे आव्हान असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com