

India vs New Zealand Test Series
Sakal
New Zealand vs India Test Series Schedule: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० पाठोपाठ वनडे मालिकाही रविवारी (१५ नोव्हेंबर) जिंकली. आता भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) स्पर्धेचा भाग असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.
भारतीय संघ सध्या WTC च्या पाँइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंड अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेतून न्यूझीलंड अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करतील, तर भारतीय संघालाही अंतिम सामन्याच्या शर्यतीत राहण्यासाठी कसोटी मालिकेत विजय गरजेचा आहे.