
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तानला टी२० मालिकेत ४-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर शनिवारपासून वनडे मालिकेला सुरूवात झाली असून पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेपियरला झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ७३ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात न्यूझीलंडने ३४५ धावांचे लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४४.१ षटकात २७१ धावांवर सर्वबाद झाला.