
एकीकडे आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तान संघ न्यूझीलंड दौऱ्यावर खेळत आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेचा शेवटचा आणि पाचवा सामना बुधवारी (२६ मार्च) पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आणि मालिकाही ४-१ अशा फरकाने जिंकली.
विशेष म्हणजे या मालिकेत न्यूझीलंडचे अनेक प्रमुख खेळाडू भाग नाहीत. कारण बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आहेत, तर काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशातही न्यूझीलंडने मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे.
शेवटच्या सामन्याआधीच न्यूझीलंडने मालिकेतील विजय निश्चित केलेला होता, त्यामुळे पाकिस्तानला प्रतिष्ठेसाठी खेळायचे होते. मात्र शेवटच्या टी२० सामन्यातही न्यूझीलंडनेच बाजी मारली.