

India T20I Team Captaincy Options
Sakal
Team India T20 Captain: टी-२० वर्ल्डकप पटकावणाऱ्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला भारतीय संघातून वगळण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आगामी आयर्लंड व इंग्लंड यांच्याविरुद्ध टी-२० व वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे.
या मालिकांपासून भारतीय संघ पुढील दोन वर्षात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप २०२७ आणि टी२० वर्ल्ड कप २०२८ व ऑलिम्पिक २०२८ या स्पर्धांच्या दृष्टीकोनातून संघबांधणीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. अशात या संघामध्ये सूर्यकुमार यादवला (Suryaumar Yadav) स्थान मिळणार नसल्याचे सूत्रांकडून समजले आहे.