
U19 Women's T20I World Cup 2025: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हणतात, याचा प्रत्येय पुन्हा एकदा सोमवारी (२० जानेवारी) आला आहे. चक्क न्यूझीलंड संघ नायजेरियाकडून पराभूत झाला आहे. मलेशियामध्ये सध्या १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्ड कप सुरू आहे.
या स्पर्धेत सोमवारी नायजेरियाच्या १९ वर्षांखालील महिला संघाने मोठा उलटफेर केला आहे. त्यांनी न्यूझीलंडला अवघ्या २ धावांनी पराभूत करत इतिहास घडवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना अत्यंत रोमांचक झाला.