

MS Dhoni
sakal
MS Dhoni Controversy Grows as CSK Face Sharp Criticism: महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये एकही सामना खेळला नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या माजी कर्णधाराला दुखापतीमुळे संपूर्ण लीगमध्ये खेळता नाही आले. पण, तो आज खेळेल, उद्या खेळेल... या आशेने चाहते स्टेडियमवर गर्दी करत होते. CSK व्यवस्थापनाकडूनही ठोस अशी उत्तरंही मिळत नव्हते, त्यामुळे धोनीच्या खेळण्याबाबतचा संभ्रम वाढत गेला. मग त्यांच्या एका प्रशिक्षकाने सांगितले की, दुखापतीतून सावरत असताना त्याला पुन्हा पोटरीच्या स्नायूला ताण आला, ज्यामुळे त्याच्या पुनरागमनाला आणखी विलंब झाला.