Asia Cup 2025: गिल, सूर्या किंवा संजू नव्हे तर 'हे' तीन खेळाडू भारतासाठी गेम चेंजर ठरणार! वीरेंद्र सेहवागचा दावा
आशिया कप २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर असून सूर्या यादव कर्णधार आहे.
सेहवागच्या मते गिल, सूर्या वा संजू नव्हे तर बुमराह, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती हे गेम चेंजर ठरतील.
भारताचा गट A मध्ये UAE, पाकिस्तान आणि ओमान संघांचा समावेश असून पहिला सामना १० सप्टेंबरला UAE विरुद्ध होईल.
Virender Sehwag predicts 3 surprise game-changers for India at Asia Cup 2025 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी ४ किंवा ५ सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा खेळणार आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत आणि सूर्यासह शुभमन गिल, सजू सॅमसन हे चमकतील असे सर्वांना वाटते. पण, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचे मत काही वेगळे आहेत.