

Rohit Sharma Amazed as Fan Cycles From Odisha
Sakal
Rohit Sharma Fan Viral Video: आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. त्यासाठी काही चाहते अनोख्या गोष्टीही करतात. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचीही लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. त्याचे चाहतेही त्याला खूश करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. असाच एक चाहता चक्क ओडिशावरून सायकल चालवत मुंबईत रोहितला भेटायला आला होता.