
Operation Sindoor Impact: Major Blow to Pakistan Super League
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतीय सैन्याने ऑपरेशन सूंदरने स्ट्राईक केलं. पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह अनेक सेलेब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट भारतात बंद केले गेले. त्यांचे यूट्युब चॅनेलही बंद केले गेले. पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील थेट प्रक्षेपणही बंद केले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) आर्थिक फटका बसतोय. त्यात आता PSL मधून परदेशी खेळाडूंना माघार घ्यायची आहे. त्यात पाकिस्तान सरकार एवढं घाबरलं आहे की, त्यांनी उर्वरित सर्व सामने कराची येथे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ( All PSL matches shifted to Karachi)