
पाच दिवसांपूर्वी २२ एप्रिलला संपूर्ण भारताला हादवणारी घटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये घडली. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यात २६ जणांची आपले प्राण गमावले. यातील सर्वाधिक नागरिक हे पर्यटक होते. तिथे फिरायला आलेल्या पर्यटकांनाच दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं.
या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. ही संघटना पाकिस्तानमधील लष्कर-ए-तायबा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे. त्यानंतर भारतातून पाकिस्तानबद्दल संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या.