SHAHID AFRIDI QUESTIONS INDIA’S ACCUSATIONS OVER PAHALGAM ATTACK
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. पहलगाम येथील प्रत्यक्षदर्शी पर्यटकांच्या सांगण्यानुसार दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केल्याचे समोर आले. या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारनेही सडेतोड उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. या घटनेला चार दिवस झाले, पण भारतीयांच्या मनातील संतापाची आग कमी होण्याचे नाव घेत नाही. भारताच्या कारवाईने चिडलेल्या पाकिस्तानकडूनही बेताल वक्तव्यांची मालिका सुरू आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) भारताकडे पुरावे मागितले आहेत.