Umpire’s Call Ends Babar Azam’s Knock
Kagiso Rabada Dismisses Babar Azam With Cracker Delivery : पाकिस्तानचा 'किंग' बाबर आझम याचा अम्पायरने करेक्ट कार्यक्रम केल्याने चाहते खवळले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे आणि पहिल्या कसोटीत चांगला खेळ पाहायला मिळतोय. मात्र, पहिल्या डावात २३ धावांवर बाद झालेल्या बाबरला दुसऱ्या डावात चांगला सूर गवसला होता. पण, अम्पायरच्या निर्णयाने त्याला तंबूत जावे लागले. अम्पायरच्या निर्णयावर पाकिस्तानी संतापले आहेत आणि बाबरच्या समर्थनात सोशल मीडियावर पेटले आहेत.